Saturday, March 23, 2013

पुस्तकानुभव - मुसाफिर

एखाया माणसाचे अनुभव विश्व किती समृद्ध असावे  याला काही प्रमाणात तरी सीमा असते..माणसाची बौद्धीक पातळी, त्याची आवड निवड, विविध विषयामध्ये रस घेण्याची त्याची आवड, विविध विषय आत्मसात करण्याची त्याची कुवत, ते आत्मसात करण्यासाठी अफाट कष्ट घेण्याची तयारी,  समाजकारण समजण्याची आणि त्यात स्वताला झोकून देण्याचे धैर्य वगैरे अनेक गोष्टी माणसाचे अनुभव विश्व समृद्ध करत असतात असे मला वाटते. पण अच्च्युत गोडबोले यांनी या साऱ्या सीमा पार केलेल्या दिसतात...मुसाफिर हि त्यांची आत्मकहाणी...

हे पुस्तक वाचेपर्यंत गोडबोले हे एक कॉम्पुटर विषयातील तज्ञ एवढीच माझी त्यांची ओळख होती...मी २००० सालामध्ये बांद्र्यामध्ये C-DAC चे प्रशिक्षण घेत असताना गोडबोले सर आम्हाला operating system या विषयावर व्याख्यान द्यायला आले होते.   अजून सुद्धा त्यांची सुटाबुटातली ती प्रतिमा माझ्या डोळ्यासमोर स्पष्ट आहे. खरे तर त्यावेळेला त्यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाने मला भारावून टाकले होते. त्यांचा विषय सोपा करून सांगण्यातला हातखंडा आणि कुठेही आपण L&T सारख्या मोठ्या कंपनीचे CEO असल्याचा कुठेहि बडेजाव नसणे हि त्यामागची करणे असावीत. पण त्याच्या व्यक्तिमत्वाला इतके पैलू असतील याची पुसटशी सुद्धा कल्पना मला आली नव्हती.

या आधी मी अच्चुत गोडबोले आणि अतुल कहाते यांचे स्टीव जॉब्स वरील पुस्तक वाचले होते. त्यामुळे गोडबोले यांची लेखनशैलीची थोडी का होइना पण ओळख होती असे म्हणायला हरकत नाही. पण "मुसाफिर" हा माझ्यासाठी एक नवीन, अदभूत आणि मनाला चटका लावणारा ठरला.

गोडबोले यांचे हे आत्मचरित्र म्हणजे एक अत्यंत प्रामाणिक पणे कथन केलेली चकित करून टाकणारी कहाणी आहे. त्यांचे सोलापूर मध्ये गेलेले बालपण, आय आय टी सारख्या उच्च संस्थेमधील त्यांचे शिक्षण, आय आय टी मधील इग्रजी शिकण्यासाठीची त्यांची धडपड, संगीताची त्यांची आवड, समाजकारणाचा त्यांनी घेतालाला ध्यास व त्यासाठी झालेला तुरुंगवास अत्यंत प्रभावीपणे आपल्या समोर येतात. कुठल्याही विषयाचे मूळ गाठून तो पूर्णपणे आत्मसात केल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. अवघड आहे ते सोपे करावे, सोपे आहे ते सहज करावे आणि ते सर्व जनाला सांगावे असे तत्व त्यांनी आयुष्यभर अवलंबलेले दिसते.

धुळ्याजवळ शहादा येथील आदिवासी भागात काम केल्यानंतर परत मुंबई ला आल्यावर त्यांची झालेली ससेहोलपट, मुंबईच्या वेश्या वस्ती आणि झोपडपट्टी मधील त्यांचे अनुभव सर्व काही सुन्न करणारे आहे. त्यांचा कॉम्पुटर क्षेत्रामधील प्रवेश, तिथली वैफाल्यग्रस्तता, त्यातून निर्माण झालेली व्यसनाधीनता, मुलाला झालेला असाध्य आजार, व्यसनाधीनते मधून बाहेर येण्याची धडपड, मुलासाठी त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने घेतलेले अपार कष्ट, कॉम्पुटर तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी वाहून घेतलेली धडपड वाचून उर भरून येते.

आपल्या ३२ वर्षाच्या कॉम्पुटर क्षेत्रामधील कारकिर्दीत २० वर्षे त्यांनी पटनी, L&T आणि सिंटेल सारख्या कंपन्यांचे उच्चपद भूषविले...त्यांची काही पुस्तके आज अनेक देशामध्ये पाठ्यपुस्तक म्हणून वापरतात ...अनेक इतर विषयावरील त्यांची पुस्तके लोकप्रिय आहेत. संगीत, शास्त्र, व्यवस्थापन, मानसशास्त्र अशा सगळ्या विषयात ते लीलया  विहार करताना आढळतात.

इतके पैलू असलेल्या या अजब मुसाफिराला माझा मनापासून नमस्कार.

Sunday, March 17, 2013

असेच काहीसे... २

चालणे...

एकट्याने चालणे हल्ली आवडायला लागले आहे...
स्वताशी बोलताना प्रामाणिक व्हायला जमायला लागले आहे...
थोडक्यात काय ... "चालू"पणा सोडायला यायला लागले आहे...
 

चिमण्या...

पहाटेचा चिमण्यांचा चिवचिवाट म्हणजे खरे जीवन...
नंतर दिवस उजाडल्यावर असतो तो फक्त  गिधाडांचा धुमाकूळ...
चिमण्या पाखरांनी जगायचे तरी कसे?


माझ्या कविता...

आजकाल फारच कविता सुचायला लागतात...
बसल्या बसल्या मनपाखरे हवेत उडायला लागतात..
मित्र म्हणतात "डॉक्टर काय म्हणाले? काळजी घेत जा..."


पार्टटाईम समाजसेवा...

स्वताभोवती कुंपण टाकून जगायची सवय लागली आहे आम्हाला..
वीकेंड ला समाजसेवा "status symbol" म्हणून करणारी माणसे आम्ही..
बाबा आमटे, अभय बंग, वाचले पण उमगले नाही कधी....


 

Sunday, March 10, 2013

असेच काहीसे...


अंधार

अंधार दाटलेला...माझ्या मनात...
पौर्णिमा असून पण मनीचा चंद्र...
कायम झाकोळलेला.....

 

अभ्यास

मुलांचा अभ्यास घेता घेता....
मी लहान झालो...
वाटले लहान असताना कोणी हवे होते माझापण असा अभ्यास घेणारे...


सायंकाळ

दिवस रिटायर व्हायला आलेला...
सूर्यानेपण हात टेकले...
सायंकाळ आली पेन्शन बनून  ... एवढेच काय ते सुख...


आरसा

ती आरशात पाहताना...
वाटते आरसा बनावे...
आणि खरे खरे मत, न घाबरता मांडावे...

देव, दुष्काळ आणि नवस...


देवा मला पण एकदा नवस बोलायचं आहे...सगळ्यांसारखे मला पण तुझ्याकडे काही मागायचे आहे...
देशील ना....

देवा काय मागू हेच कळत नाही...तुला द्यायला जमेल का नाही हे पण वळत नाही...
तरी पण....
देवा मला पण एकदा नवस बोलायचं आहे...सगळ्यांसारखे मला पण तुझ्याकडे काही मागायचे आहे...
देशील ना....

देवा, सर्वाना खायला अन्न नाही पण प्यायला पाणी तरी देशील का...देवा पाण्यावाचून मरून जाण्यार्या माझ्या लोकांना जीवन देशील का...
देवा मला पण एकदा नवस बोलायचं आहे...सगळ्यांसारखे मला पण तुझ्याकडे काही मागायचे आहे...
देशील ना....

देवा आम्ही शहरामध्ये राहतो, प्रत्येकाच्या घरात स्वतंत्र नळ आहे...
पाण्याची किंमत आम्हाला कदाचित कळत नाही....कारण आमच्या नळाचे पाणी कधी सरत नाही...
देवा आम्हाला पाण्याची किंमत समजावून सांगशील का...  पाण्यावाचून मरून जाण्यार्या माझ्या लोकांना जीवन देशील का...
देवा मला पण एकदा नवस बोलायचं आहे...सगळ्यांसारखे मला पण तुझ्याकडे काही मागायचे आहे...
देशील ना....

देवा, कधी स्वर्गामध्ये दुष्काळ पडतो का रे...पाण्यासाठी भांडणे होतात का रे...
देवा पण एक नक्की सांगतो...पाण्याशिवाय काही लोकांना जिवंतपणी नरक यातना सहन कराव्या लागतात रे....
देवा आता तरी आम्हाला पावशील का...थोडे का होईना पण तहानलेल्या माझ्या लोकांना पाणी पाजशील का....
देवा मला पण एकदा नवस बोलायचं आहे...सगळ्यांसारखे मला पण तुझ्याकडे काही मागायचे आहे...
देशील ना....

Tuesday, April 24, 2012

Steve Jobs - एक असामान्य माणूस...

Steve Jobs - एक असामान्य माणूस ....हो, माणूसच ...व्यक्तिमत्व  वगेरे फार मोठे आणि जड शब्द आहेत ..Steve हां माणूस होता...आणि  शेवटपर्यंत माणूस म्हणुनच जगला... ज्याचे पाय कायम जमिनीवर राहिले असा माणूस...
शुन्यातुन विश्व निर्माण करणारी उमेद, धडाडी असणारा माणूस...Technology ला कल्पकतेची साथ देऊन उत्तम उपकरणे निर्माण करण्याचा ध्यास घेणारा माणूस ...


Apple कंपनीचा सर्वेसर्वा असणारा Steve...एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी कहानी जगलेला Steve..
नुकतेच माझ्या वाचण्यात अच्युत गोडबोले आणि अतुल कहाते यांचे Steve वरचे पुस्तक आले ...अत्यंत सुन्दर पुस्तक आहे अणि जर तुम्हाला वाचायला मिळाले तर जरुर वाचा...

त्याच्या आयुषाताल्या काही महत्वाच्या घडामोडी खालील प्रमाणे आहेत ...

२४ फेब्रुवारी १९५५ - जन्म

1972 - कॉलेज शिक्षण अर्धवट सोडले

१ अप्रैल १९७६ - आपल्या एक मित्राबरोबर (Wozniak) Apple कंपनी ची स्थापना ..

१९७६ (Summer ) - Apple I ची निर्मिती - बाजारातील किम्मत ६६६.६ dollars

१९७७ - Apple  II  ची निर्मिती - या computer  ला प्रचंड प्रतिसाद

१९८० - Apple  चा पब्लिक इश्यु बाजारामधे दाखल ...

१९८२ - Apple  ची वार्षिक उलाढाल $१ billion  च्या घरात पोचली.

१९८३ - Steve  ने पेप्सी चा सीईओ स्कली याला Apple  मधे सीईओ म्हणून बसवले.

१९८५ - स्कली आणि Steve  यांचे मतभेद आणि Steve  ची Apple  मधून हकालपट्टी....

१९८६ - Steve ने नेक्स्ट नावाची कंपनी स्थापन केली. Steve  ने Pixar  नावाची कंपनी $१० million ला विकत घेतली.

१९८९ - नेक्स्ट कंपनी चा पहिला कंप्यूटर बाजारामधे दाखल .. किम्मत होती $६५००.

१९९५ - Steve च्या Pixar animations  ने Toy Story  नावाचा animated पिक्चर काढला जो प्रचंड लोकप्रिय झाला ...या पिक्चरने Pixar  चा IPO  $१४० मिल्लिओं पर्यंत नेउन ठेवला. या नंतर चा Pixar  चा दूसरा लोकप्रिय पिक्चर होता Finding  Nemo...

१९९६ - Apple  ने Next कंपनी ने बनवलेली Operating  System $४३० millon  dollar  ला विकत घेतली आणि Steve  परत Apple  मधे advisory  कमिटी वर आला...

१९९७ - Steve  ची apple  मधे तात्पुरता सीईओ म्हणून appointment  झाली ..

१९९८ - Apple  ने iMac बाजारामधे आणला ..आणि Steve  मुले apple  परत मोठी नफा कमावाणारी कंपनी झाली

२००० - Steve  परत apple  मधे सीईओ (तात्पुरता नाही) पदावर कार्यरत झाला...

२००१ - Steve  च्या कल्पकते मधून apple ने आईपॉड बाजारामधे आणला...

२००३ - apple  ने iTune  Music Store  आणले अणि त्यावर २ लाख गाणि विक्रीस ठेवली (९९ सेन्ट्स each ) . आणि पहिल्या आठवड्यात १ million  गाणि विकली गेली ...

२००४ - Steve  ची पहिली कैंसर surgery  झाली.

२००५ - Apple  ने Mac  साठी Intel चिप वापरणार असे जाहिर केले.

२००६ - Steve  ने Pixar  कंपनी Disney  ला ७.४ billion  dollar  ला विकली.

२००७ - Apple  ने iPhone रिलीज़ केला.

२०१० - Apple  ने १५ million  iPad विकले ते सुद्धा फ़क्त ९ महिन्यामधे. 

२४ August २०११ - Steve ने सीईओ पदाचा राजीनामा दिला.

०५ October २०११ - Steve चे कैंसर ने वयाच्या ५६ व्या वर्षी निधन.


प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या मी आणि माझ्या सारख्या हजारो लोकांच्या उदरनिर्वाहाची सोय केलेल्या Steve ला प्रणाम...

Monday, December 14, 2009

चेतन भगत, इंग्रजी पुस्तके आणि मी ...

सहसा मी इंग्लिश पुस्तके वाचत नाही (ह्याचा अर्थ मराठी पुस्तके कायम वाचतो असा घेऊ नये). पण चार चौघाच्या मधे impression मारायला अशी वाक्ये खुप उपयोगी पडतात असा माझा अनुभव आहे.

तर मुद्दा असा की मी इंग्रजी पुस्तके वाचत नाही (आणि खरे सांगायचे ता ती मला कळत नाहीत)....
इंग्रजी पुस्तके मी फ़क्त showcase मधे चांगली दिसतात म्हणून आणतो (आणि सासुरवाडीतील लोकांवर भाव मारण्यासाठी त्याचा उपयोग करतो) असा मोनाली (अस्मादिकांची अर्धांगिनी) चा गोड गैरसमज आहे ...

पण "चेतन भगत" या एका माणसाने माझा हा समज मोडीत काढला आहे. ह्या एका महिन्यात मी त्याची चारही पुस्तके वाचून काढली आहेत. माझे मागील चारही weekend हे पूर्ण चेतनमय झाले होते. अगदी बायकोचे बोचरे टोमणे, शिव्या खात (पुस्तके वाचत बसण्यापेक्षा मुलांचा अभ्यास घ्या ..काय timepass करता ...वगेरे वगेरे सहन करत...) पण चिकाटी न सोडता ही सर्व पुस्तके मी वाचून काढली आहेत.
One night at call center. Five Point Someone, 2 States आणि 3 Mistakes of my life.
सर्वच पुस्तके फारच सुरेख आहेत ...

One night at call center ही एका call center मधे काम करणारया तरुण युवक युवतींची आहे....साधारणपणे एका रात्रि ११-१२ तासांमधे घडलेल्या गोष्टींच्या आजुबाजुला ही कादंबरी फिरत राहते ... ती एक रात्र प्रत्येकाचे आयुष्य बदलून टाकते ...

2 States ही IIM अहमदाबाद इथे शिकत असलेल्या, दोन वेगळ्या राज्यातून आलेल्या आणि एकमेकांच्या प्रेमात पडलेल्या युगुलाची आहे .. चेतन भगतच्या स्वताच्या आयुष्यावर ही कादंबरी आधारलेली आहे ..

Five Point Someone ही ३ IIT विद्यार्थांची गोष्ट आहे ....हयात Hostel Life विषयी बरेच काही आहे ...त्यामुले मला ही कादंबरी ज़रा जास्तच जवळची वाटली ....

The 3 Mistakes of My Life - अहमदाबादमध्ये नव्याने business सुरु केलेल्या तिन युवकांची ही कहानी शेवटी गोधरा हत्याकांड - या ह्रुदयाद्रावक घटनेपाशी येवून ऐक नाट्यमय वलन घेते ...

असो, एकंदरीत मला चेतन भगत भावला ... कधी वेळ मिळाला तर चेतनची एखादी कादंबरी वाचा ...ती नक्कीच तुम्हाला विचार करायला लावेल ....

Monday, December 7, 2009

स्वयंघोषित समाजसेवक (Social Freelancer) .... पु लंचा आधुनिक नारायण उर्फ़ केदार इनामदार

कधी कधी कही माणसे जन्माला येतात ती समाजसेवेचे व्रत घेउनच .... ह्याला ऐच्छिक समाजसेवक (social freelancer) म्हणतात ...
आमचा मित्र (भाग्यच आमचे, आम्ही त्याला मित्र म्हणू शकतो)...आमचा केदार इनामदार हा त्यातलाच ऐक ...

त्याला कुठल्याही गोष्टीचे आमंत्रण लागत नाही ...कोणी ह्याला पत्ता विचारायला आला की स्वारी एकदम खुश ... हा स्वताला चालता बोलता Google Map समजतो ...
पत्ता माहित असो वा नसों ..पण समोरच्याला मदत करने हे ह्याचे आद्य कर्त्तव्य असते ... मग त्यासाठी तो चुकीचा पत्ता सांगायला पण कमी करत नाही ... "आपण मदत केली" हीच ऐक निरागस भावना त्याच्या मागे असते .. तुम्हाला कुठल्याही गावाला जयाचे असो .... फ़क्त त्याला सांगायचे .... तुम्ही किती वाजता निघायचे ...कसे निघायचे ...बरोबर काय काय घ्यायचे .... काय घ्यायचे नाही ...कुठला रस्ता जवळचा आहे... तुम्ही घेणार असलात तर किती घ्यायची ...कुठली घ्यायची ....कुठे घ्यायची ... कशी घ्यायची ... कशा बरोबर घ्यायची... ही सगली माहिती न मागता तुम्हाला मिळेल ...... Wine या प्रकारमधे याला विशेष गति आहे ....कोठल्या प्रकारची wine कुठे बनाते ...कशी बनाते ...कुठे स्वस्तात मिलते ....किती रुपयांना मिलते....हे सर्व याला जन्मजात माहित आहे ...... बहुतेक त्याला जन्मापासून Wine Flu झाला असावा.....

हीच मदतीची भावना ऑफिसच्या कामामधे कायम उफालून येत असते ...असो .... न मागता मदत करने हा ह्याचा स्थायीभाव आहे ...
जर तुम्हालाही कधीही कसलाही प्रोब्लेम असेल, कुठे गावाला जयाचे असेल ...कुठलाही पत्ता हवा असेल .... office च्या कामा मधे शंका असतील .... तर ह्याला contact करायला विसरु नकात ...आणि जर तुम्ही विसरलाताच.....तर अजिबात कालजी करू नकात .. आमचा हा समाजसेवक तुमचा पत्ता शोधत तुमच्या घरी मदत करायला येइन... ह्याची आम्हाला खात्री आहे ...