Monday, December 14, 2009

चेतन भगत, इंग्रजी पुस्तके आणि मी ...

सहसा मी इंग्लिश पुस्तके वाचत नाही (ह्याचा अर्थ मराठी पुस्तके कायम वाचतो असा घेऊ नये). पण चार चौघाच्या मधे impression मारायला अशी वाक्ये खुप उपयोगी पडतात असा माझा अनुभव आहे.

तर मुद्दा असा की मी इंग्रजी पुस्तके वाचत नाही (आणि खरे सांगायचे ता ती मला कळत नाहीत)....
इंग्रजी पुस्तके मी फ़क्त showcase मधे चांगली दिसतात म्हणून आणतो (आणि सासुरवाडीतील लोकांवर भाव मारण्यासाठी त्याचा उपयोग करतो) असा मोनाली (अस्मादिकांची अर्धांगिनी) चा गोड गैरसमज आहे ...

पण "चेतन भगत" या एका माणसाने माझा हा समज मोडीत काढला आहे. ह्या एका महिन्यात मी त्याची चारही पुस्तके वाचून काढली आहेत. माझे मागील चारही weekend हे पूर्ण चेतनमय झाले होते. अगदी बायकोचे बोचरे टोमणे, शिव्या खात (पुस्तके वाचत बसण्यापेक्षा मुलांचा अभ्यास घ्या ..काय timepass करता ...वगेरे वगेरे सहन करत...) पण चिकाटी न सोडता ही सर्व पुस्तके मी वाचून काढली आहेत.
One night at call center. Five Point Someone, 2 States आणि 3 Mistakes of my life.
सर्वच पुस्तके फारच सुरेख आहेत ...

One night at call center ही एका call center मधे काम करणारया तरुण युवक युवतींची आहे....साधारणपणे एका रात्रि ११-१२ तासांमधे घडलेल्या गोष्टींच्या आजुबाजुला ही कादंबरी फिरत राहते ... ती एक रात्र प्रत्येकाचे आयुष्य बदलून टाकते ...

2 States ही IIM अहमदाबाद इथे शिकत असलेल्या, दोन वेगळ्या राज्यातून आलेल्या आणि एकमेकांच्या प्रेमात पडलेल्या युगुलाची आहे .. चेतन भगतच्या स्वताच्या आयुष्यावर ही कादंबरी आधारलेली आहे ..

Five Point Someone ही ३ IIT विद्यार्थांची गोष्ट आहे ....हयात Hostel Life विषयी बरेच काही आहे ...त्यामुले मला ही कादंबरी ज़रा जास्तच जवळची वाटली ....

The 3 Mistakes of My Life - अहमदाबादमध्ये नव्याने business सुरु केलेल्या तिन युवकांची ही कहानी शेवटी गोधरा हत्याकांड - या ह्रुदयाद्रावक घटनेपाशी येवून ऐक नाट्यमय वलन घेते ...

असो, एकंदरीत मला चेतन भगत भावला ... कधी वेळ मिळाला तर चेतनची एखादी कादंबरी वाचा ...ती नक्कीच तुम्हाला विचार करायला लावेल ....

9 comments:

  1. aasach kahis majhya baddal ghadal
    pratham mi marathi pustake wachayacho pan pu. la. chya palikade kahi wachayala aavadhale nahi
    aahi English pustak tar aandharya guphe sarkhi watayachi. pan jeva Bahinine Chetan Bhagatche 2States Aanun dile teva hi bhiti dur geli.
    Easy English, Aaplya roz ghadnarya gostinchi yogya ti janiv theun sopya bhashet lihato Chetan Bhagat.
    mi Chetan Bhagat chi Sarva pustake wachali nantar
    English Pustakan babat Aavadh nirman zali mhanun Shantaram Vachun Baghitale Aaika Austrilian Mansala Jagayala Shikwanara India Khas Karun Mumbai tyat sundar ritya (most of Dark Side)
    lihala aahe to jarur vacha lekhak : Greory David Robert

    ReplyDelete
  2. तुमचं वाचुन चेतन भगतची पुस्तक वाचली पाहिजेत अस वाटायला लागलं आहे. नक्कीच वाचेन सारी पुस्तक.

    धन्यवाद.

    -अजय

    ReplyDelete
  3. भरपूर लोकप्रिय झालाय तो. काल मुंबई एअरपोर्टवर माझ्या विमानातले ४ लोक २ स्टेट्स वाचत होते.

    ReplyDelete
  4. माझही काहीसं असच आहे. चेतन भगत वाचण्यापुर्वी मी कदाचितच एखाद पुस्तक वाचल असेल. आज रात्री 2-स्टेट्स संपवतो आहे. खरचं लै भारी आहे हा लेखक.

    ReplyDelete
  5. मलाहि आवडल त्याच ५ पॉईन्ट.... जमल तर "द मॉंक हु सोल्ड हिज फेरारी" नक्की वाच. पीडीएफ़ हवि असेल तर सांग...

    ReplyDelete
  6. Thanks विजय, मी "The Monk who ....." नक्की वाचेल ...पण PDF document वाचताना पुस्तकाचा फिल येत नाही असा माझा वैयक्तिक अनुभव आहे ... सल्ल्याबद्दल धन्यवाद ..अजुन ही काही चांगली पुस्तके असतील तर नक्की सांग - सुहास

    ReplyDelete
  7. five points someone cha marathi anuvad dekhil titkach mast aahe.

    ReplyDelete
  8. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  9. ५ पोईट समवन, हे माझ्या मते त्याच सर्वात चांगल पुस्तक. गतिमान आणि विनोदी. नंतर नंतर तो फारच वाहवत गेला. एक गोष्ट छानच की त्याने एकंदर अनेक लोकांना इंग्रजी साहित्याची गोडी निर्माण केली. म्हणजे तो स्वतः अगदी महान लेखक नव्हे मात्र सोप्या भाषेत शब्दबंबाळ न करता लोकांपर्यंत कथा पोहोचवता आल्या त्याला. इथेच त्याच यश.

    चेतन भगत ची तुलना आपल्या मराठी मध्ये प्रदीप दळवीशी करता येईल असं वाटतं. सोप्पी सुटसुटीत पुस्तकं :)

    पण माझ्या मते Jefery Archer ची काही पुस्तक वाचून हळूहळू इंग्राही साहित्यात प्रवेश करण फार छान :)

    ReplyDelete