Monday, November 23, 2015

आपले दिवस

आठवतात ते आपले दिवस...
कारण नसताना एकमेकांकडे बघून हसणे....
एकमेकांच्या सहवासा साठी मित्राना चुकवणे....

आठवतात ते आपले दिवस...
माझाशी बोलताना तुझा तो कायम खुललेला चेहरा...
जणू काही ऋतु नसतांना चाफा आलेला बहरा....

आठवतात ते आपले दिवस...
युनिव्हर्सिटी सर्कल जवळचा तो बस-स्टॉप अजूनही आपली वाट पाहतो....
अजूनही तो तिथे आपण तासनतास मारलेल्या गप्पांच्या आठवणी मध्ये चिंब नाहतो...

आठवतात ते आपले दिवस...
तुला आठवते ते आपले पाषाण तलावा जवळचे भेटणे...
एकमेकांच्या मिठीमध्ये असतांना डोळ्यात पाणी दाटणे....

आठवतात ते आपले दिवस...
ऑफिस मध्ये रोज एकमेकांना चोरून चिट्ठी देणे...
कोणाच्या नकळत तुझे मला तुझ्या डब्यातील घास देणे....

आठवतात ते आपले दिवस...
आता ते दिवस परत येणार नाही हे मला माहित आहे....
पण आपल्या आठवणींचा ओलावा अजूनही मनाला मोहित आहे....

- संवादी




..


No comments:

Post a Comment