Monday, November 23, 2015

वय आणि मी

आज काल थोडेसे वय जाणवायला लागले आहे....
झोप अजूनही लागते पण स्वप्न हरवायला लागले आहे...

पूर्वीची ती उमेद, तो उत्साह कुठेतरी हरवला वाटते...
माझीच सावली आता माझ्याकडे वेडावून पाहते...

पैश्याच्या मागे धावताना हल्ली खूप दमछाक होते...
मग कविता लिहिणे, पुस्तक वाचणे यांचे सुद्धा ओझे होते...

मंद वाऱ्याची झुळूक हल्ली जणू काही बोचायला लागली आहे...
कुठली तरी जुनी आठवण सारखी डोक वर काढून टोचायला लागली आहे...

कधी तरी मन परत उभारी धरेल या आशेवर दिवस ढकलतो आहे...
स्वतः मधल्या हरवलेल्या  मी पणाला नव्याने शोधतो आहे...

- संवादी 

आपले दिवस

आठवतात ते आपले दिवस...
कारण नसताना एकमेकांकडे बघून हसणे....
एकमेकांच्या सहवासा साठी मित्राना चुकवणे....

आठवतात ते आपले दिवस...
माझाशी बोलताना तुझा तो कायम खुललेला चेहरा...
जणू काही ऋतु नसतांना चाफा आलेला बहरा....

आठवतात ते आपले दिवस...
युनिव्हर्सिटी सर्कल जवळचा तो बस-स्टॉप अजूनही आपली वाट पाहतो....
अजूनही तो तिथे आपण तासनतास मारलेल्या गप्पांच्या आठवणी मध्ये चिंब नाहतो...

आठवतात ते आपले दिवस...
तुला आठवते ते आपले पाषाण तलावा जवळचे भेटणे...
एकमेकांच्या मिठीमध्ये असतांना डोळ्यात पाणी दाटणे....

आठवतात ते आपले दिवस...
ऑफिस मध्ये रोज एकमेकांना चोरून चिट्ठी देणे...
कोणाच्या नकळत तुझे मला तुझ्या डब्यातील घास देणे....

आठवतात ते आपले दिवस...
आता ते दिवस परत येणार नाही हे मला माहित आहे....
पण आपल्या आठवणींचा ओलावा अजूनही मनाला मोहित आहे....

- संवादी




..


Tuesday, November 17, 2015

तू आणि श्रावण

खुदकन तुझे गोड हसणे
गालावरती चढते लाली....

तू हसता श्रावण येतो
श्रूष्टीवरती हिरव्या शाली....

- संवादी

होडी


Friday, November 6, 2015

जिंदगी और हिसाब

ऐ जिंदगी चल फुरसत में हिसाब करने बैठते है...
तू थोड़ी अपनी कह...हम थोड़ी अपनी कहते है...

हो सके तो मेरे बिछड़े हुए कुछ हसीं पल मुझे लौटा दे...
ख़ुशी का सागर नहीं दे सकता तो दो-चार जाम ही पिला दे...

याद है ना तेरे पास मैंने अपना बचपन  गिरवी रखा है ...
उसका सूद तो मै लौटा ना सका मगर बदले में तू बुढ़ापा मत दे...

तूने सितम तो बहुत किये...बहुत कुछ छीन लिया हमसे...
सब कुछ ले ले मगर जाने के बाद दो गज जमीन पे हम हक़ दिखायेंगे दिलसे ...

मैं और किस्मत

हम तो जिन्दगीके थपेड़ोंसे लड़ते लड़ते शहीद हो गये...
कहनेको दोस्त बहुत थे मगर ना जाने सबने कब किनारा कर दिया...

अगर खुदा चाहता तो हमारी जिंदगी सवार सकता था...
मगर मेरी किस्मत तो देखो खुदा ने भी हमें किस्मत का हवाला दे दिया

ऐसा लगा था किसी रोज हमारी किस्मत का सितारा बुलंदी पे होगा
अपनी झोलीमे ख़ुशी डालने से पहलेही उपरवाला नौ दो ग्यारह हो गया

- संवादी