Sunday, June 29, 2014

असेच काहीसे - 3

रवलेले बालप


आयुष्याच्या शर्यतीमधे धावताना बालपण कधी सरले कळलेच नाही...
मोठेपण्याच्या मुखवटयामागे लपताना हसू कसे हरवले कळलेच नाही...

दुधबील, लाईटबील, घराचा हप्ता यांनी आयुष्य व्यापले आहे...
पैश्याच्या मागे असे धावतो जणू काही आभाळ फाटले आहे...

कधी कधी वाटते द्यावी सगळी टेंशंस आणि बंधने झुगारून...
बालमित्राना आवाज द्यावा आणि त्यांनी पण आनंदाने यावे आपल्या मागाहून...

पण मग दिसतात डोळ्यासमोर प्रोजेक्ट्स, क्लाइंट्स आणि डेडलाइन...
सर्व इच्छा आकांक्षा मारून ऑफिस मधे खोटे हसून म्हणायचे "हे एवेरी थिंग इज फाइन..."

लपंडाव, शिवाशीवी आता जणू इतिहास जमा झाल्यासारखे वाटतात...
मध्यरात्री दचकून उठतो, वाटते मित्र राहिलेला डाव मागतात...

"आज नाही पण उद्या नक्की" म्हणून मनाला समजावतो...
माझे मन पण  नेहेमीप्रमाणे मनातच हसून कधीही न येणारया उद्याची वाट पाहतो...

- सुहास

2 comments:

  1. छान कविता. अगदी मनातलं बोललात.

    ReplyDelete