Sunday, June 7, 2015

विठू सावळा


सावळाच माझा देव पंढरीचा...विठू नाव त्याचे भाव अंतरीचा ||१||

कटेवरी हात विटेवरी पाय...विश्वाची काळजी, वाहते माझी माय ||२||

हा दिसे दिवाळी हाच माझा राम...याचा चरण स्पर्श, हाच उत्सव तृप्तिचा ||३||

याच्या दर्शनाने हरपते भान...मन समाधते, दिसे मार्ग मुक्तीचा ||४||

माझे सुख विठ्ठल माझे दुःख विठ्ठल...माझे मन विठ्ठल, सृष्टित साठे भाव भक्तिचा ||५||

हाच माझी आई हाच माझा बाप...मी सामान्य दुर्बळ, हाच स्त्रोत शक्तिचा ||६||

माझे सत्व विठ्ठल, माझे तत्व विठ्ठल...
माझे स्वत्व विठ्ठल, माझा स्वार्थ विठ्ठल...
माझे मन विठ्ठल, माझे तन विठ्ठल...
माझे असणे विठ्ठल, माझे नसणे विठ्ठल...
माझे हसणे विठ्ठल, माझे रडने विठ्ठल...
अवघाची विठ्ठल व्यापे चरा चरा...

- सुहास

Thursday, June 4, 2015

कप बशी मधील संवाद ....

(नवरा बायकोमधील संवादावर आधारित)


एकदा बशी गंमतीने म्हणाली कपाला ...
असा कसा रे तू वेडा, सगळे धरतात तुझ्या कानाला....

कप म्हणाला ...
केलास ना स्वताच्या आकाराप्रमाणे उथळ विचार ...
मीच आठवतो सर्वांना..म्हणून तर म्हणतात एक कप चहा आणा...तू तर फक्त नावाला...

बशी रागावली....म्हणाली...
नको गर्व करूस आपल्या आकाराचा...खोली ही विचारात असावी आकारामध्ये नाही....

कप वरमाला...म्हणाला...
बरोबर आहे तुझे...गरम चहाचा दाह तूच कमी करतेस....कोणाच्या लक्षात येत नसेल पण कपाचा balance बशीच सांभाळते....

- सुहास