Wednesday, July 2, 2014

पाउस (न पडलेला)

पावसा, मित्रा असा का वागलास रे...
कधी नाही पण या वेळेस का रुसलास रे...

आपलीच माणसे कधी आपल्यावर रुसतात का?
आपल्याच घरी कोणी पाहुण्या सारखे वागतात का?

आता पर्यन्त असे वागलास ठीक आहे, या पुढे तरी लपू नकोस...
माझे एक वेळ ठिक आहे, माझ्या शेतकरी भावावर तरी रुसू नकोस...

अरे रुसणे फुगणे ही सामान्यांची लक्षणे, तुला हे शोभत नाही...
बळीराजाचा विचार कर, त्याला तुझ्याशिवाय कोणाची सोबत नाही...

पावसा, मित्रा...धो धो पडलास तर तुझ्या "पाउस"पणाला अर्थ आहे...
आणि तसेही तुझ्याशिवाय आमचे जीवन व्यर्थ आहे...

- सुहास