Thursday, November 20, 2014

किंमत

आजकाल मला वाटते की माझ्या वाटण्याला काही  किंमत उरली नाही...
मी तुमच्यामधे असलो तरी माझ्या असण्याला काही किंमत उरली नाही...

मला काही  कळत नाही असे नाही..फ़क्त माझे रडगाणे मी सारखे दळत नाही एवढेच..
तुम्ही मात्र कळून न कळल्यासारखे करता...माझ्या कळण्याला काही किंमत उरली नाही...

मी प्रेमाने तुमच्या कडे तासनतास बघतो...तुमच्या एका कटाक्षाची वाट पाहत असतो...
तुम्ही मात्र माझ्याकडे ढूंकून सुध्हा बघत नाही...माझ्या बघण्याला काही किंमत उरली नाही...

मी तुमच्या आनंदामधे स्वताचा आनंद बघतो...तुम्ही हसलात की मी हसतो...
तुम्ही मात्र स्वता मधेच मशगूल असता, स्वतशीच् हसत राहतात....माझ्या हसण्याला काही किंमत उरली नाही...

तुमच्या आठवां मधे मी स्वताला झोकुन् देतो.. मनातील प्रेमाला अश्रुंवाटे व्यक्त होउन देतो....
तुम्ही मात्र स्वताच्या सुखामधे,आनंदामधे डूबन जाता, माझ्या रडण्याला काही किंमत उरली नाही...

एक्दा नाही तर लाखो वेळा तुमच्या प्रेमात पडलो ...स्वप्न आणि सत्याचा मेळ घालताना धड़पडलो...
तुम्ही मात्र कायम स्वताच्या विश्वात तरंगत आलात...माझ्या पडण्याला काही किंमत उरली नाही...

अनेकदा मी तुम्हाला वेड्यासारखा फिरताना दिसतो...माणसा मधील खरेपणा ओळखताना कायम फसतो...
तुम्ही मात्र हुशारीच्या खोट्या बुरख्यामागे स्वतला लपवता...माझ्या खरेपणाला काही किंमत उरली नाही...

सुहास, पुणे

1 comment: