Thursday, August 20, 2009

एन आर् नारायणमूर्ति - एक असामान्य व्यक्तिमत्व ....

आज २० August - एन आर् नारायणमूर्ति यांचा वाढदिवस ..... IIM Ahmedabad, पटनी, टेल्को अशा ठिकाणी काम केल्या नंतर नारायणमूर्ति यांनी आपल्या सहा सहकार्याँबरोबर Infosys ची स्थापना केली। Infosys ने जगाला भारताकडे बघायचा दृष्टिकोण बदलण्यास भाग पाडले .... Infosys कंपनी भारताच्या इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी क्षेत्रातील मुकुटमणि बनली ... त्या मागे नारायणमूर्ति आणि सहकार्यांचे अथक असे प्रयत्न आहेत ... Infosys ही Nasdaq च्या लिस्ट मध्ये आलेली पहिली भारतीय कंपनी ठरली ...... कोणी... विश्वास ठेवेल का की २५० डोंलर्स मधे चालू झालेली Infosys कंपनी इतकी प्रगति करेल ...पण हे सर्व नारायणमूर्ति अणि सह्कार्यांचे परिश्रम आणि मेहनत ...
नारायणमूर्ति यांना बघितल्यावर वाटते हीच ती "साधी राहणी आणि उच्च विचारसरणी..."

खरच... एक आदर्श, असामान्य असे व्यक्तिमत्व .... एन आर् नारायणमूर्ति

Monday, August 17, 2009

स्वाइन फ्लू ....आणि आम्ही

माझी पुतणी सेंट हेलेना मध्ये आहे ...आनी तिच्या वर्गातील एका मुलीस स्वाइन फ्लू झाला ....
आणि माझ्या पुतणीला स्वाइन फ्लू टेस्ट करण्यास सांगितले ..आणि आमच्या पाया खालची जमीन हादरली .... तो पर्यंत स्वाइन फ्लू च्या बातम्या टीवी वर बघताना विशेष असे काही वाटत नव्हते ... पण आता मात्र जेव्हा स्वाइन फ्लू घरापर्यंत आला तेव्हा मात्र खुप टेंशन आले ... तो पर्यंत नायडू हॉस्पिटल फ़क्त न्यूज़ मधेच बघितले होते ....पण आता मात्र प्रत्यक्षात जाण्याशिवाय पर्याय नव्हता ...

हॉस्पिटल पर्यंत जाताना खुप टेंशन होते ... जेवढी जमेल तेवढी खबरदारी घेत होतो ... कुठेही हात लावायचा नाही कोणाच्या जवळ जायचे नाही ...असे सारखे मनाला बजावत होतो ..प्रचंड मोठी लाइन बघून पोटात धड़की भरली .... पण खरे सांगू .... टेंशन कमी कमी होत गेले ... आपण एकटेच नाही ही भावना पण धीर देवून जाते ....

एक गोष्ट प्रकर्षाने नमूद कराविशी वाटते ...नायडू हॉस्पिटल मधील स्टाफ चे कौतुक करावे तेवढे थोड़े आहे ... प्रचंड काम आणि प्रचंड pessions ... खुप खुप धन्यवाद ...
डॉ अनिल खरच खुप co-operative होते ....खुप मदत करत होते ....खरया अर्थाने आपल्या पेशाला जागत होते ... अशी माणसे असतील तर ...कुठलेही संकट आले तरी सामान्य माणुस हार मानणार नाही ....