Monday, August 17, 2009

स्वाइन फ्लू ....आणि आम्ही

माझी पुतणी सेंट हेलेना मध्ये आहे ...आनी तिच्या वर्गातील एका मुलीस स्वाइन फ्लू झाला ....
आणि माझ्या पुतणीला स्वाइन फ्लू टेस्ट करण्यास सांगितले ..आणि आमच्या पाया खालची जमीन हादरली .... तो पर्यंत स्वाइन फ्लू च्या बातम्या टीवी वर बघताना विशेष असे काही वाटत नव्हते ... पण आता मात्र जेव्हा स्वाइन फ्लू घरापर्यंत आला तेव्हा मात्र खुप टेंशन आले ... तो पर्यंत नायडू हॉस्पिटल फ़क्त न्यूज़ मधेच बघितले होते ....पण आता मात्र प्रत्यक्षात जाण्याशिवाय पर्याय नव्हता ...

हॉस्पिटल पर्यंत जाताना खुप टेंशन होते ... जेवढी जमेल तेवढी खबरदारी घेत होतो ... कुठेही हात लावायचा नाही कोणाच्या जवळ जायचे नाही ...असे सारखे मनाला बजावत होतो ..प्रचंड मोठी लाइन बघून पोटात धड़की भरली .... पण खरे सांगू .... टेंशन कमी कमी होत गेले ... आपण एकटेच नाही ही भावना पण धीर देवून जाते ....

एक गोष्ट प्रकर्षाने नमूद कराविशी वाटते ...नायडू हॉस्पिटल मधील स्टाफ चे कौतुक करावे तेवढे थोड़े आहे ... प्रचंड काम आणि प्रचंड pessions ... खुप खुप धन्यवाद ...
डॉ अनिल खरच खुप co-operative होते ....खुप मदत करत होते ....खरया अर्थाने आपल्या पेशाला जागत होते ... अशी माणसे असतील तर ...कुठलेही संकट आले तरी सामान्य माणुस हार मानणार नाही ....

1 comment: