झोप अजूनही लागते पण स्वप्न हरवायला लागले आहे...
पूर्वीची ती उमेद, तो उत्साह कुठेतरी हरवला वाटते...
माझीच सावली आता माझ्याकडे वेडावून पाहते...
पैश्याच्या मागे धावताना हल्ली खूप दमछाक होते...
मग कविता लिहिणे, पुस्तक वाचणे यांचे सुद्धा ओझे होते...
मंद वाऱ्याची झुळूक हल्ली जणू काही बोचायला लागली आहे...
कुठली तरी जुनी आठवण सारखी डोक वर काढून टोचायला लागली आहे...
कधी तरी मन परत उभारी धरेल या आशेवर दिवस ढकलतो आहे...
स्वतः मधल्या हरवलेल्या मी पणाला नव्याने शोधतो आहे...
- संवादी