Saturday, February 28, 2015

माझ्यातला नसलेला कवी(?) ...


उन मलाही लागले...पावसात मी पण भिजलो
बरेच उन्हाळे पावसाळे आले आणि गेले....पण माझ्यातला कवी कधी भिजलाच नाही...माझ्यातला कवी कधी भिजलाच नाही...


माझेही मन बऱ्याच वेळा बंड करून उठले...बरीच वादळे पेटली...
पण मला कधी त्यांना शब्दात बांधता आलेच नाही....आणि माझ्यातला कवी कधी पेटलाच नाही...माझ्यातला कवी कधी पेटलाच नाही...


अहो प्रेम मी पण केले ...अगदी तुमच्या सारखेच 'सेम' च केले...
पण कागदावर उतरावताना मात्र ते 'लेम"च राहिले ...माझ्यातला कवी कधी कागदावर उतरलाच नाही...माझ्यातला कवी कधी कागदावर उतरलाच नाही...


चंद्र मी रोजच पाहतो ...त्याच्या प्रकाशात मी रोजच नहातो....
माझ्यासाठी साक्षीला मात्र तो कधी आलाच नाही ...माझ्यातल्या कविमनात भाव कधी दाटलाच नाही...माझ्यातल्या कविमनात भाव कधी दाटलाच नाही...


- सुहास, पुणे