Sunday, March 10, 2013

असेच काहीसे...


अंधार

अंधार दाटलेला...माझ्या मनात...
पौर्णिमा असून पण मनीचा चंद्र...
कायम झाकोळलेला.....

 

अभ्यास

मुलांचा अभ्यास घेता घेता....
मी लहान झालो...
वाटले लहान असताना कोणी हवे होते माझापण असा अभ्यास घेणारे...


सायंकाळ

दिवस रिटायर व्हायला आलेला...
सूर्यानेपण हात टेकले...
सायंकाळ आली पेन्शन बनून  ... एवढेच काय ते सुख...


आरसा

ती आरशात पाहताना...
वाटते आरसा बनावे...
आणि खरे खरे मत, न घाबरता मांडावे...

2 comments:

  1. मला तुमचा ब्लॉग मनापासून आवडला. मला एखादी गोष्ट आवडल्यानंतर त्यावरती फार चांगली comment करता येत नाही,त्यामुळे मी इतकेच लिहू शकलो.

    ReplyDelete